निगडीपर्यंत मेट्रोसाठी मानवी साखळी

– विविध संघटनांचे भक्‍ती-शक्‍ती चौकात आंदोलन

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो पिंपरीपर्यंत न नेता, ती निगडीपर्यंत न्यावी, या मागणीसाठी विविध संघटनांच्या वतीने निगडीतील भक्‍ती-शक्‍ती चौकात मानवी साखळी करण्यात आली.

निगडी बस स्थानकावरून पुणे शहराकडे जाण्याऱ्या बसेस प्रवाशांनी भरभरून जातात. या भागात शैक्षणिक संकुले, शासकीय कार्यालये व अन्य महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्यामुळे पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यातच निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी ही मानवी साखळी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.

यामध्ये पोलीस नागरिक मित्र, ज्येष्ठ नागरिक संघ सिद्धिविनायक नगरी, संस्कार प्रतिष्ठान, रोटरी क्‍लब ऑफ चिंचवड मोरया, सावरकर मंडळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पतंजली योग समिती, सुप्रभात मित्र परिवार ग्रुप दुर्गाटेकडी, नवयुग शैक्षणिक व साहित्य मंडळ निगडी प्राधिकरण, भावसार व्हिजन, निगडी प्राधिकरण रेसिडन्स फोरम, ज्येष्ठ नागरिक महासंघ पिंपरी-चिंचवड, घरकुल फेडरेशन, ग्राहक पंचायत, रोटरी क्‍लब ऑफ निगडी, लायन्स क्‍लब पुणे निगडी, रेडझोन संघर्ष समिती, जलदिंडी, सांगली जिल्हा मित्र मंडळ प्रतिष्ठान अशा अनेक संघटनांनी सहभाग नोंदविला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)