निगडीत 31 वर्षीय महिलेची आत्महत्या

पिंपरी, (प्रतिनिधी) – राहत्या घरात गळफास घेवून एका 31 वर्षीय महिलेने आत्महत्या केली. शुक्रवारी (दि. 19) सकाळी साडेदहा वाजता हा प्रकार उघडकीस आला.

मिनाक्षी राजू जलनिला (वय 31, रा. इद्रांयणी हाऊसिंग सोसायटी, तळवडे) असे त्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहत्या घरात छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. निगडी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)