निगडीत भरदिवसा सेल्समनचा खून

पिंपरी – टपरीवर थांबलेल्या इसमाचा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कोयत्याने वार करून खून केला. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी तीनच्या सुमारास अजंठानगर येथे घडली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

नंदू चव्हाण (वय-39, रा. सांगवी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदू सेल्समन म्हणून काम करतो. दुपारी तीनच्या सुमारास तो अजंठानगर येथील हुंदाई शोरूमच्या मागच्या बाजूला एका टपरीवर सिगारेट पिण्यासाठी थांबला होता. सिगारेट पित असताना एका दुचाकीवरून दोघेजण आले. अचानक त्यांनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये चव्हाण गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने डॉक्‍टरांनी घोषित केले. आरोपी घटनास्थळावरून पळून गेले आहेत. निगडी पोलीस आरोपींच्या मागावर आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)