निगडीत गुरुवारी रोजगार मेळावा

निगडी- आयआयसीएमआर आणि फ्रेशर्स जॉब फेअरच्या सहकार्याने पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी निगडी येथील सेक्‍टर 27 मध्ये आयआयसीएमआर कॉलेजमध्ये गुरुवार दि. 11 रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत रोजगार मेळावा आयोजित केला आहे. यामध्ये 28 कंपन्या सहभागी होणार आहेत. अनुभवी व फ्रेश विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या विविध क्षेत्रातील संधी उपलब्ध होणार आहेत. तरी या संधीचा फायदा घ्यावा. येताना आपली सर्व प्रमाणपत्रे व बायोडाटा (फोटोसह) आणावा, असे आवाहन आयआयसीएमआरचे संचालक डॉ. अभय कुलकर्णी यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)