निगडीत आयबीएस प्रीमियर लीग

निगडी – इंडियन बिझनेस क्‍लबच्या (आयबीएस) वतीने आयोजित केलेल्या आयबीएस प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदानावर करण्यात आले.

यावेळी क्रीडा आयुक्त आशा राऊत, नगरसेवक अमित गावडे, राजेंद्र बाबर, उद्योजक रंगनाथ गोडगे, आयबीएसचे संचालक अनिल मित्तल, अभय खिंवसरा, दिलीप मॅथ्यू, क्रीडा संचालक कैलाश पारिक, मितेश मकवाना, विजय तारक, सुरेंद्र अगरवाल आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापौर जाधव म्हणाले की, शरीर तंदुरुस्तीसाठी मैदानी खेळ खेळले पाहिजेत. शहरातील उद्योजकांनी एकत्र येवून क्रीडाविषयक उपक्रम राबवल्या बद्दल त्यांनी गौरवोद्‌गार काढला. या स्पर्धेत 10 संघ सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा आगरवाल हिने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)