निगडीतील हॉटेलमध्ये टोळक्‍याचा धुडगूस

– कर्मचाऱ्याला मारहाण ; सहा जणांवर गुन्हा

पिंपरी – निगडी ओटा स्कीम येथे 6 जणांनी हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून धुडगूस घातला. तसेच, हॉटेल मधील आचाऱ्याच्या हातावर वार केले. रविवार (दि. 16) सायंकाळी साडेसातच्या सुमारास हॉटेल दुर्वेश येथे हा प्रकार घडला. पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शाहरुख खान, सलमान खान, फैयाज खान, मुल्ला खान, गुड्डू सिद्दीकी, निळाज खान अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी दुर्वेश हॉटेलचे मालक असिफ इम्रान यांनी फिर्याद दिली आहे. अंकुश चौक येथे सायंकाळी येथील हॉटेलमध्ये सहाजण आले. त्यांनी हॉटेल मधील खुर्च्या व सामानांची मोडफोड केली. त्या सर्वांना थांबवण्यासाठी गेलेला आचारी राजू चौधरी याच्या हातावर कोयत्याने वार केले. त्यात चौधरी गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात मारहाण व तोडफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)