निगडीतील गणेश तलावाची दूरवस्था

अस्वच्छतेमुळे घाणीचे साम्राज्य 
पिंपरी, (प्रतिनिधी) – निगडी, प्राधिकरण येथील गणेश तलावाची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली आहे. तलावाची साफसफाई आणि डागडुजीकडे दुर्लक्ष होत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. महापालिका आयुक्तांनी उद्यान विभागास आदेश देऊन त्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

या परिसराला वाढलेले गवत आणि अस्वच्छतेमुळे संपूर्ण तलावाला उतरती कळा लागली आहे. पाण्यात शेवाळ्याचे प्रमाण वाढले असल्याने जलचरांना धोका वाढला आहे. तसेच, परिसरात गवत वाढले असल्याने कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. तलावाची संरक्षक भिंतीचे दगड निखळले आहेत. परिसरात उंच गवत आणि झुडपे मोठया प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे डास उत्पत्ती होत आहे. तेथे निर्माल्य कलश तसेच पडून आहेत. त्याचा वापर होणे आवश्‍यक आहे. येथील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, हा परिसर केवळ गणेशोत्सव काळात साफ केला जातो. त्यानंतर येथे कोणी लक्ष घालत नाही. तसेच, कोणीही अधिकारी फिरकत नाही. पाणी पुरवठा करण्यासाठी असणाऱ्या पंपींग मोटारीची खोली आहे. तेथील वायर उघड्यावर असल्याचे धोका वाढला आहे.

त्यामुळे महापालिका आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पर्यावरण प्रेमी मनोज वडके, अमृत महाजनी, राम सुर्वे, रवी भावके, तुकाराम दहे, जयेंद्र मकवाना, जयप्रकाश शिंदे, संदीप सकपाळ, विजय पाटील यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)