निगडीतील अंध दाम्पत्याला अपना वतन कडून मदत

वाकड – निगडी येथील अंध महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या दाम्पत्याला अपना वतन संघटनेने सामाजिक बांधिलकीतून मदत केली.

निगडी येथे सेक्‍टर क्रमांक 22 मध्ये कांतीलाल पावरा व रुपाली पावरा हे अंध नव दाम्पत्य एका लहानशा खोलीत भाड्याने राहत आहे. दोघेही निगडी येथील अंध महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असून शिक्षण व कुटुंबाचा दैनंदिन गाडा हाकण्यासाठी रोज पुणे ते लोणावळा रेल्वे प्रवास करून चिक्की विक्रीचा व्यवसाय करतात. त्यातून मिळणारे उत्पन्न अल्प व अनियमित असल्याने अनेकदा त्यांना उपाशीपोटी झोपावे लागते व खोलीचे भाडे देणे देखील मुश्‍किल होते. नवीन संसार थाटण्यासाठी व शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदतीसाठी ते धावाधाव करीत होते.

अपना वतन संघटना पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष सिद्दीक शेख यांना सर्व हकीकत सांगितली. तातडीने जमवा-जमव करून महिनाभर पुरेल एवढे सामान आणि दहा हजार रुपये रोख देऊन या दाम्पत्याची चिंता काहीशी कमी केली.एखाद्या कंपनीमध्ये त्यांना नोकरी लावण्याचा प्रयत्न करू, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगीतले. यावेळी अपना वतन संघटनेचे संपर्क प्रमुख हरिश्‍चंद्र तोडकर, महिला शहराध्यक्ष राजश्री शिरवळकर, अपना वतनचे चिंचवड विभाग प्रमुख फारुख शेख, नॅशनल ब्लॅक पॅंथर पार्टीच्या संगीत शहा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम, विठ्ठल कांबळे, देवेश पिंगळे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
15 :thumbsup: Thumbs up
28 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)