निगडाळे येथे व्यसनांची प्रतिकात्मक होळी

मंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या आदिवासी डोंगरी भागातील निगडाळे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत होळी सणाचे औचित्य साधून “चला करुया व्यसनांची होळी’ या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य वैभव लोहकरे, प्रदीप कुऱ्हाडे, सुभाष मदगे, सहशिक्षिका अलका गुंजाळ, मुख्याध्यापक संतोष थोरात, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

सुरुवातीला विद्यार्थ्यांनी गावातून स्वच्छताफेरी काढून व्यसने टाळा-आरोग्य सांभाळा, चला व्यसनांची होळी करुया-निरोगी जीवन जगूया, व्यसनांपासून दूर रहा असे संदेश फलक हातात घेऊन जनजागृती केली. त्यानंतर शाळेच्या मैदानात गोळा केलेला कचरा, तंबाखूजन्य पदार्थ, मावा व गुटख्याची रिकामी पाकिटे जाळून व्यसनांची प्रतिकात्मक होळी पेटविण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचा सामाजिक संदेश दिला. वृक्षसंवर्धन, पाणी बचत व व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)