निगडाळे येथे गाडगेबाबा यांची जयंती साजरी

मंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या आदिवासी दुर्गम भागातील निगडाळे (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत स्वच्छतेचे प्रसारक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त ग्रामस्वच्छता मोहीम व बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस आंबेगाव तालुका साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष सीताराम गुंजाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रदीप कुऱ्हाडे, सुभाष मदगे, अंगणवाडीसेविका नंदाबाई लोहकरे, मदतनीस लीलाबाई लोहकरे, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी संत गाडगे महाराज स्मृतीदिन विशेष “गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ हे भजन गायले. यावेळी शाळेत बालसभा घेण्यात आली. बालसभेच्या अध्यक्षस्थानी इयत्ता चौथीची विद्यार्थिनी श्रेया लोहकरे होती. विद्यार्थी सुमित लोहकरे, प्रसाद कोकाटे, साहिल लोहकरे यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवन चरित्रावर आधारित भाषणे केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी गाडगेबाबा यांच्या दशसूत्री संदेशांचे वाचन करून त्याप्रमाणे आचरण करण्याची शपथ घेतली. शिक्षक व विद्यार्थ्यांनी गावात स्वच्छता मोहीम राबवून अंगणवाडी, ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, समाजमंदिर, बौद्धविहार परिसरात स्वच्छता केली. कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका अलका गुंजाळ यांनी केले. मुख्याध्यापक संतोष थोरात यांनी आभार मानले. यावेळी कथामालेचे अध्यक्ष सीताराम गुंजाळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)