अवसरी – आदिवासी डोंगरी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडाळे (ता. आंबेगाव) येथे ठाणे येथील शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत सॉफ्टवेअर ई-प्रशाला टीमच्या सामाजिक-शैक्षणिक उत्तरदायित्व निधीतून एलईडी ई-लर्निंग प्रोजेक्‍टर संच देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या रूपा जगदाळे होत्या. शुभारंभ आंबेगाव पंचायत समितीचे उपसभापती नंदकुमार सोनावले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी समाजकल्याण विभागाचे माजी सभापती सुभाष मोरमारे, पंचायत समिती सदस्या इंदुबाई लोहकरे आदी मान्यवरांसह शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तुकाराम कुऱ्हाडे, केंद्रप्रमुख चिमा बेंढारी, मुख्याध्यापक संतोष थोरात, समिती सदस्य, विद्यार्थी, ग्रामस्थ व आदी उपस्थित होते. यावेळी उपसभापती नंदकुमार सोनावले म्हणाले, जिल्हा परिषद शाळेतील गुणवत्ता इंग्रजी शाळेपेक्षा निश्‍चितच अधिक असून आनंददायी शिक्षण, अध्यापनात ई-लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर, सेमी इंग्रजी वर्ग, सहशालेय उपक्रम यामुळे आदिवासी भागातील शाळातील पटसंख्या वाढण्यास मदत होणार आहे. ई-प्रशाला यांमधून शाळा डिजिटल होण्यास मदत होत आहे. शाळेविषयी मुलांमध्ये आवड निर्माण होऊन खडू-फळा विरहीत ओझ्याविना दप्तर शिक्षणाकडे वाटचाल होईल. दानशूर शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ, सामाजिक सहकारी संस्था यांनी याकामी सहकार्य करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)