निक जोनसविषयी प्रियांका म्हणाली….

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्या अफेअरची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच रंगली आहे. दरम्यान दोघांना अनेक ठिकाणी एकत्र बघण्यात आलंय. एकीकडे निक प्रियंकासोबतच्या त्याच्या नात्याबाबत मोकळेपणाने बोलताना दिसतोय तर दुसरीकडे आता प्रियंकानेही निकसोबतच्या बॉंडिंगबाबत पहिल्यांदाच जाहीरपणे बोलली आहे.

पिपुल मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत प्रियंका म्हणाली की, ‘आम्ही सध्या एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मला असं वाटतं की, हा त्याच्यासाठीही(निक) एक चांगला अनुभव असेल’. गोव्यामध्ये निकने प्रियंकाच्या परिवारासोबत वेळ घालवला. आणि नंतर आकाश अंबानीच्या साखरपुड्यातही दोघांनी एकत्र एन्ट्री घेतली होती.

प्रियंका पुढे म्हणाली की, ‘कोणत्याही रिलेशनशिपमध्ये आपल्या पार्टनरसोबत प्रवास करणं फार वेगळं असतं. पण माझ्यासाठी हे रूटीन आहे. माझं संपूर्ण आयुष्य प्रवास करणं हेच आहे. माझा प्रत्येक दोन आठवड्यांनी फिरायला जाण्याचा प्लॅन होत असतो. कधी सोबत मित्र असतात तर कधी परिवार. माझ्यासाठी हे नॉर्मल आहे’. दरम्यान, नुकतेच दोघांना न्यूयॉर्कमध्ये डिनर करताना स्पॉट करण्यात आले होते. त्यासोबतच प्रियंकाचे काही फोटो व्हायरल झाले असून त्यात ती निकच्या परिवारासोबत वेळ घालवताना दिसते आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)