निक आणि प्रियांकाची गुपचूप एन्गेजमेंट

प्रियांका आणि तिचा बॉयफ्रेंड निक जोनास यांच्यातील अफेअरबाबत आता सगळ्यांना माहित झाले आहे. लॉस एंजेलिसमध्ये असताना प्रियांका निकबरोबर सगळ्या इव्हेंटसला उपस्थित असायची. त्यांनी एकत्र हॉटेलिंग, शॉपिंग, मुव्हीज आणि टुरिंगही केले. अमेरिकेत भेटी गाठी आणि मनसोक्त डेटिंग केल्यावर प्रियांका आपल्या या खास दोस्ताला घेऊन भारतात आली आणि चक्क गोव्याच्या ट्रीपवर रवाना झाली. तिgnच्याबरोबर तिचे कुटुंब आणि आणखीही काही मित्र मंडळी होती. निकला भेटल्यावर सगळ्यांनाच खूप आनंद झाला. विशेषतः प्रियांकाची धाकटी बहिण परिणितीदेखील त्याला भेटून खूप खुष झाली.

प्रियांका बऱ्याच दिवसांपासून अमेरिकेतच राहिली होती, त्यामुळे तिची आणि आपली भेटच झाली नव्हती. तिची भेट होणेच दुर्मिळ झाले आहे. तिच्याबरोबर तिच्या मित्रलाही भेटून आपण खुष असल्याचे परिणिती म्हणाली. तिने गोव्याच्या ट्रीपचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती आणि प्रियांका “टिप टिप बरसा पानी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निकने आपण प्रियांकाबरोबरच्या रिलेशनशीपबाबत सिरीयस असल्याचे मान्य केले आहे. आपल्याला तिच्याबरोबर “लिव्ह इन’मध्ये रहायला आवडेल. असे तो म्हणाला आहे. प्रियांकाच्या आई वडिलांनाही निक भेटून आला असल्याचे समजते आहे. निकसाठी प्रियांकाने मुंबईतल्या घरी एक पार्टी आयोजित केली होती. त्यामध्ये काही बॉलिवूड स्टारही होते. यावेळी निकची सगळ्यांशी ओळखही झाली. या निमित्ताने निकचा पाहुणचार झाला. पण निकची फक्‍त एकदाच डिनरच्यावेळी भेट झाली. त्या एकाच भेटीत एखाद्याबाबत मत बनवता येत नसल्याचे प्रियांकाच्या आईने म्हटले. म्हणजे गोष्टी आता पुढे सरकायला लागलेल्या दिसत आहेत. त्यातच प्रियांका आणि निक यांच्या बोटांमध्ये एकसारख्या अंगठ्या दिसल्या. या दोघांनी गुपचूप एन्गेजमेंटही उरकून टाकली की काय, असेही वाटायला लागले आहे. पण निक आणि प्रियांका यांच्या हातातल्या अंगठ्या जरी एकसारख्या असल्या तरी प्रियांकाने पहिल्या बोटात आणि निकने मध्यल्या बोटात अंगठी घातली आहे. म्हणजे ही काही एन्गेजमेंट रिंग निश्‍चितच नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)