निकृष्ट भोजन पुरवठा करणाऱ्या 8 ठेकेदारांना नोटीस

राजगुरूनगर: आदिवासी वसतिगृहातील मुलांना चांगल्या दर्जाचे भोजन दिले जात नाही. त्यात सुधारणा करण्याबाबत भोजन पुरवठा करणाऱ्या 8 ठेकेदारांना कारणेदाखवा नोटीस पाठविण्यात आली होती. त्या अनुषंगाने त्याची सुनावणी बुधवारी (दि.28) घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे प्रकल्प कार्यालयात दुपारी 2 वाजता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव येथे होणार आहे, अशी माहिती प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव यांच्या अंतर्गत पुणे विभागात अनेक ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्याची वसतिगृहे चालविण्यात येतात. मात्र, या वसतिगृहातील मुलांना चांगल्या दर्जाचे भोजन दिले जात नाही, अशा तक्रारी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीची दखल प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतली होती. त्यानुसार प्रसाद यांनी प्रत्यक्ष वसतिगृहाला भेट देऊन पाहणी केली होती. यामध्ये या आठ पुरवठाधारकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांची सुनावणी येत्या 28 तारखेला घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे होणार आहे. यासाठी सहप्रकल्प अधिकारी रामचंद्र पंडूरे, दीपक कालेकर, एस. आर. इंगळे यांची चौकशी समिती नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.

 • निकृष्ट भोजन पुरवठा करणारे आठ ठेकेदार
  मे. आशिष ट्रेडिंग कंपनी सालगाव, (ता. आंबेगाव)-(आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह मांजरी फार्म अंतर्गत केशवनगर, पुणे),
  टीपटोप इंत्राप्रयाजेस कराड (जिल्हा सातारा) -(आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह कराड, जिल्हा सातारा),
  सिटीज किचन (खराडी), पुणे-(आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह मांजरी फार्म अंतर्गत केशवनगर, येवलेवाडी, शेवाळवाडी, जि. पुणे),
  सिध्देश्वर आदिवासी बेरोजगार संस्था सालगाव (ता. आंबेगाव, पुणे) (आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह पिंपरी चिंचवड, मांजरी फार्म, डेहणे जिल्हा पुणे),
  जिजामाता महिला बचतगट, खडकी पिंपळगाव (ता. आंबेगाव, पुणे) (आदिवासी मुलींचे/मुलांचे शासकीय वसतिगृह कराड, अदिवासी मुलांचे/ मुलींचे वसतिगृह जुन्नर,पुणे),
  ओम आदिवासी सेवा प्रतिष्ठान जुन्नर, पुणे (आदिवासी मुलांचे /मुलींचे शासकीय वसतिगृह जुन्नर, जिल्हा पुणे),
  आशा इंटरप्रायझेस जुन्नर पुणे-(आदिवासी मुलांचे/मुलींचे शासकीय वसतिगृह ओतूर, जिल्हा पुणे),
  आणि गावळीबाबा महिला बचत गट आंबेनगर, (ता. अकोला, अहमदनगर)-(आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, हडपसर, जि. पुणे)

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)