निकृष्ट कामामुळे बदेवाडी पुलावर खड्डे

भुईंज, दि. 1 (प्रतिनिधी) – ग्वाल्हेब बंगळूर आशियाई महामार्गावर बदेवाडी येथे बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावर वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात रस्ता खचला आहे. यावरुन हे काम किती निकृष्ठ आहे याच अंदाज येत आहे.
आयटीडी कंपनीने बदेवाडी येथे घाई घाईने बांधलेल्या ऊड्डान पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने त्यावरुन धावत असलेल्या वाहनांचा भार पेलवत नसल्याने जागो जागी रस्ता खचुन त्याचे रुपांतर खड्यात होऊन पुलात चढ ऊतार तयार झाले आहेत. पुलावरुन सुसाट धावणारी वाहने यात आदळुन अनेक वाहने पलटी झाल्याने पुलावर अपघातांची मालिका सुरु झाली आहे. तर पुलाखाली असलेल्या भुयारी मार्गातील पाणी जाण्याची कसलीच व्यवस्था नसल्याने त्या ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने बदेवाडी ग्रामस्थांची येण्याजाण्याची गैरसोय निर्माण झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, या महामार्गावरील बदेवाडी, ता. वाई गावच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून अपघातांची मालिका सुरु होऊन शेकडो वाहनचालकांसह स्थानिक ग्रामस्थांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यात आढळून येतात. ही अपघातांची मालिका रोखण्यासाठी भुईंज बदेवाडी ग्रामस्थांनी अनेक आंदोलने करुन मंत्रालयापर्यंत निवेदने देऊन ऊड्डाणपुलाची मागणी केली होती. त्या आंदोलनांना यश येऊन रस्ते विकास महामंडळाने अखेर उड्डाणपुलाच्या बांधकामास मंजुरी दिली. त्याचे काम रिलायंस कंपनीला देण्यात आले. पण, बदेवाडी येथील उड्डाण पुल आराखड्यात नसल्याचा कांगावा करुन त्याचे बांधकाम जाणीवपूर्वक गेली अनेक वर्ष रखडवले. पण, जनतेच्या रेट्यामुळे आणि रिलायंन्स कंपनीची मुदत संपत येत असतानाच बदेवाडी पुलाच्या कामास दोन महिन्यापुर्वी सुरुवात करुन तो एक महिन्यातच घाईघाईने निकृष्ठ दर्जाची कामे करुन तो पूर्ण होताच क्वॉलिटी कंट्रोलचे प्रमाण पत्र न घेताच तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
पुलावरुन सुसाट वाहनांची वाहतुक सुरु होताच पुलातील अनेक ठिकांणचा भाग खचत गेल्याने जागो जागी खड्डे पडल्याने वेगात जाणारी वाहने त्या खड्यांमध्ये आदळुन पलटी होऊन अनेकजण जखमी झाले आहेत. हाकेच्या अंतरावर भुंईज पोलिस ठाणे असल्याने पोलिसांनीही या भीषण अपघातांचा थरार अनुभवला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)