न्यायालयाकडे मागितले संरक्षण
नवी दिल्ली – इस्लाम मधील निकाह हलाला प्रथेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करून दाद मागणाऱ्या याचिकाकर्त्या शबनम राणी यांच्यावर उत्तरप्रदेशातील बुलंदशहर येथे ऍसिड करण्यात आला होता या पार्श्‍वभूमीवर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करून पोलिस संरक्षण मागितले आहे. त्यांच्या दीरानेच त्यांच्यावर हा हल्ला केला आहे.

त्यांच्या पतीने त्यांना तोंडी तलाक देऊन त्यांच्यावर दीराशी लग्न करण्याची जबरदस्ती केली आहे. त्या प्रकरणात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निकाह हलाला आणि इस्लाम मधील बहुपत्नीत्वाबद्दल अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत आणि त्यांची सध्या एकत्रित सुनावणी सुरू आहे.

या प्रकरणी पोलिस संरक्षण मिळावे अशी मागणी करणारे त्यांचे अर्ज उत्तरप्रदेश आणि केंद्र सरकार यांनाही पाठवण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेची दखल घेतली असून त्यावर 17 सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्याचे जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)