निकाल निराशाजनक – शबरीमाला मंदिर पुजाऱ्याची प्रतिक्रीया

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निराशाजनक आहे असे शबरीमाला मंदिराचे प्रमुख पुजारी के राजीवराऊ यांनी म्हटले आहे. त्यांनी या संबंधात प्रतिक्रीया देताना सांगितले की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करून नंतर त्याविषयी आम्ही योग्य तो निर्णय घेऊ.

या मंदिराच्या विश्‍वस्त मंडळाने सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना मंदिरात महिलांच्या प्रवेशाविषयी सध्या जी प्रथा सुरू आहे ती कायम ठेवण्याची विनंती न्यायालयाला केली होती. पण आता सर्वोच्च न्यायालयानेच महिलांवरील निर्बंध काढून टाकण्याचा जो निर्णय दिला आहे त्याची अंमलबजावणी करण्याखेरीज आम्हाला दुसरा मार्ग उरलेला नाही. आम्ही या निकालाचा गांभीर्याने अभ्यास करीत आहोत असे त्रावणकोर बोर्डाचे अध्यक्ष ए पद्मकुमार यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अय्यपा धर्मसेनेचे अध्यक्ष राहुल ईश्‍वर यांनी सांगितले की या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करणारी याचिका आम्ही सर्वोच्च न्यायालयात करणार आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)