भारतीय अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनस यांचा नुकताच मुंबईत साखरपुडा झाला. गेल्या महिन्यात 18 तारखेला मुंबईत प्रियंका-निकची एन्गेजमेंट पार्टी झाली. प्रियंका आणि निक जोनस हे अनेक दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. मात्र निकची यापूर्वी अनेक अफेयर्स होती. निकने अनेक अभिनेत्रींना डेट केले आहे. त्यापैकीच एका एक्‍स गर्लफ्रेंडने पहिल्यांदाच निकच्या साखरपुड्याबाबत मौन सोडले आहे.

निकची एक्‍स-गर्लफ्रेंड ओलिविया कल्पोने प्रियांका-निकच्या साखरपुड्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. ओलिविया कल्पो ही 2012 मध्ये मिस युनिव्हर्स होती. तिने एक्‍स बॉयफ्रेण्ड निकला शुभेच्छा दिल्या.

कल्पो म्हणाली, मला वाटते कोणत्याही वेळी, कोणीही आपले प्रेम मिळवू शकते. निक-प्रियंकाच्या एन्गेंजमेंटने मी आनंदी आहे. प्रत्येकाला प्रेम आणि आनंद मिळावा.

निक आणि कल्पो यांचे 2015 मध्ये ब्रेकअप झाले होते. कल्पो सध्या डॅनी अमेंडोलाला डेट करत आहे. डॅनी अमेंडोला हा मियामी डॉल्फिन फुटबॉल क्‍लबकडून खेळतो.

25 वर्षांचा निक जोनस अमेरिकन गायक, गीतकार आणि अभिनेता आहे. वयाच्या सातव्या वर्षी त्याने नाटकात काम करायला सुरुवात केली. प्रियंका चोप्रा निकपेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)