निंबोडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

मुंबई – अतिवृष्टीमुळे अहमदनगर तालुक्‍यातील निंबोडी जिल्हा परिषदेची शाळा पडून झालेल्या दुर्घटनेत मृत तीन विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक मदत म्हणून राज्य सरकारमार्फत 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च सरकारमार्फत करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. या जिल्हा परिषदेच्या शाळेचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचे आदेश अहमदनगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले असल्याचेही तावडे यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर तालुक्‍यातील निंबोडी येथील या जिल्हा परिषदेच्या शाळेचे 1998-1999 दरम्यान बांधकाम झालेले आहे. या शाळेची जुनी इमारत सलग दोन दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे कोसळली. यात तीन विद्यार्थी मृत पावले, तर सुमारे 35 विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकारमार्फत करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)