निंबळक ते भाळवणी रस्त्याचे काम सुरु

नगर तालुका मनसेच्या पाठपुराव्याला यश

नगर: अपघाताला कारणीभुत ठरणाऱ्या निंबळक ते भाळवणी रस्त्याचे काम सुरु झाले असून, नगर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या रस्त्याच्या कामाची पहाणी मनसेचे नगर तालुका प्रमुख बाळासाहेब ढवळे, सचिन निमसे, काशीनाथ चोभे, सयाजी गायकवाड, महेश निमसे, सचिन उमाप, विजू निमसे, विलास पानसंबळ, संतोष वाघमारे, योगेश निमसे, मोहंमद शफी काझी, राजू ससे, आकाश काळे आदिंसह कार्यकर्त्यांनी केली.

निंबळक ते भाळवणी रस्त्याची झालेली दुरवस्था नगर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाला निदर्शनास आनून दिली होती. रस्त्यावर वारंवार अपघात घडत असताना तातडीने दुरुस्तीची मागणी करुन आंदोलनाचा इशारा दिला होता. तर या कामासाठी पाठपुरावा देखील केला. इसळकपासून पुढे हा रस्ता दुरुस्तीचे काम सुरु झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)