“ना हरकत’ची गंभीर दखल; मनपा कर्मचाऱ्यांना नोटिसा

24 तासांत मागविला अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून खुलासा

नगर: कामाबाबत परफेक्‍ट म्हणून ओळखले जाणारे जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांपुढे काहीसे थकलेले दिसत आहे. अतिक्रमण असताना देखील उमेदवारांना “ना-हरकत’ प्रमाणपत्र दिलेल्या मनपा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर ते चांगलेच संतापले आहेत. या अधिकाऱ्यांना याप्रकरणी नोटिसा बजावणून त्यावर स्पष्टीकरण देण्याच्या सूचना केल्या आहेत. “ना-हरकत’ प्रमाणपत्रावर महापालिकेकडे तक्रार दाखल झाली आहे. त्याची दखल घेत प्रभारी आयुक्तांनी या नोटिसा बजावल्या आहेत. या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई प्रास्तावित होणार असल्याचे संकेत उपायुक्त सुनील पवार यांनी दिले.

महापालिका निवडणुकीतील उमेदवारांना अतिक्रमण असून देखील त्यांना महापालिका प्रशासनाकडून “ना-हरकत’ देण्यात आली आहे. हा प्रकार उमेदवारांच्या अर्ज छाननीत आणि पुढे न्यायालयात प्रकरण केल्यावर पुढे आला आहे. न्यायालयाने महापालिकेच्या “ना-हरकत’ प्रमाणपत्रांवर जोरदार ताशोरे ओढले होते. एकप्रकारे महापालिका अधिकाऱ्यांवरच हे ताशोरे होते. “ना-हरकत’ देऊनही अर्ज बाद केले. त्यानंतर न्यायालयाचा वेळ वाया घालविला याची गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. न्यायालयाने अर्ज वैध ठरविल्यानंतर महापालिका प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रार दाखल झाली आहे. त्याची दखल घेत प्रभारी आयुक्तांना संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावून खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. हा खुलासा वेळेच सादर करण्याच्याही सूचना आहेत. यावर देखील खुलासा सादर न झाल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई प्रस्तावित करण्याचे संकेत दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)