ना. विखेंच्या प्रयत्नातून शिर्डीला कोट्यवधींचा निधी 

नगराध्यक्षा योगिता शेळके यांची माहिती
शिर्डी – विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळविला आहे. शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी गेल्या दीड वर्षापासून उपनगराध्यक्ष, नगरसेवक, साई संस्थानच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नरत आहोत, अशी माहिती नगराध्यक्षा योगिता शेळके यांनी दिली.
नगराध्यक्षा शेळके म्हणाल्या, शहरात 22 कोटींची रस्त्याची कामे झाली. 20 कोटींची वाढीव भूमिगत गटार योजना मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी कचऱ्याचा जटील प्रश्‍न होता. साईबाबा संस्थानकडून साफसफाईसाठी ना. विखेंच्या मार्गदर्शनाखाली निधी मंजूर करून घेतला. त्यानुसार बीव्हीजी कंपनीला ठेका देण्यात आला आहे. 37 कोटी रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरात 75 कि.मी. जलवाहिनी, एक पाणी टाकी, जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. अंतर्गत रस्त्यांसाठी साईबाबा संस्थानकडून 10 कोटी रुपये मंजूर झाले. 4 कोटी रुपयांच्या अंतर्गत रस्त्यांची बांधणी केली. 9 रस्त्यांच्या भू-संपादनासाठी 275 कोटींचा प्रस्ताव मंजुरीसाठी अंतिम टप्प्यावर आहे. 25 रस्त्यांसाठी पालिकेने राज्य शासनाच्या निधीतून 21.03 कोटींचा रस्ते विकास प्रकल्प राबविला आहे. विकास आराखड्यातील 6 रस्त्यांच्या भू-संपादनासाठी 187 कोटी साईबाबा संस्थानकडून मंजूर झाले आहेत. हा प्रस्ताव शासन दरबारी मंजुरीसाठी प्रतीक्षेत आहे.
येथील वरिष्ठ महाविद्यालयाच्या पाठपुराव्याला यश आले आहे. भाविकांसाठी 4 शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. बाजारतळावर पोलीस दूरक्षेत्राला मान्यता मिळाली. येत्या वर्षभरात शहरात रस्ते, वीज, पाणी स्वच्छता अशा मुलभूत समस्या शिल्लक ठेवायच्याच नाहीत, असा आमचा प्रयत्न आहे. शहर सौदर्यीकरणासाठी वार्षिक बजेटमध्ये 1 कोटींची तरतूद करण्यात आली. अद्ययावत बहुउद्देशीय हॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हेल्थ क्‍लब, जलतरण तलाव, आदी प्रकल्प प्रस्तावित आहेत.
साईबाबा संस्थानकडून शहरातील विविध विकासकामांसाठी ना. विखे यांच्या प्रयत्नातून 321 कोटी रुपयांचा भरीव निधी मिळणार आहे. उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, गटनेते अशोक गोंदकर, मुख्याधिकारी सतीश दिघे, इतर नगरसेवक यांचे शहरातील विकासासाठी सहकार्य मिळत असल्याचे नगराध्यक्षा शेळके यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)