ना.रामराजेंवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे

आ.जयकुमार गोरेंची मागणी : पोलिसांवर दबाव आणत असल्याचा आरोप

सातारा – विधानपरिषदेचे सभापती रामराजे ना.निंबाळकर यांनी सातत्याने पोलिसांवर दबाव आणून गुन्हे दाखल करण्यास तर जबरदस्ती करून तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यामुळे तात्काळ लोणंद, फलटण पोलीस ठाण्यासह पोलीस अधिक्षक कार्यालय आणि पनवेल पोलीस ठाण्याची स्टेशन डायरी चेक करून ना.रामराजेंवर तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी आ.जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

-Ads-

आ.गोरे म्हणाले, पनवेल जमीन प्रकरणात माझ्याविरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी ज्या व्यक्तीने तक्रार अर्ज दिला आहे. मात्र, संबधित जमीन तक्रारदाराच्या नावावर नाही. उलट त्या जमीन प्रकरणात फलटणच्या सागर अभंग यांची तक्रारदार श्रीकृष्ण गोसावी यांनी फसवणूक केली होती. त्यामुळे अभंग यांनी ऑक्‍टोंबर 2018 मध्ये फलटण पोलीस ठाण्यात श्रीकृष्ण गोसावी यांच्या विरोधात फसवणूक झाल्याप्रकरणी तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर काही दिवसांनी फलटण पोलीस ठाण्याचे सपोनि भोईटे यांनी अभंग यांना ना.रामराजे व इतरांचे फोन आले असून असे सांगत तुम्ही तक्रार अर्ज मागे घ्या, असे अभंग यांना सांगितले. मात्र, त्यावेळी ना.रामराजे यांचा भोईटे यांना फोन आला व अंभग यांना वाड्यावर घेवून गेले.

वाड्यावर गेल्यानंतर ना.रामराजे यांनी अभंग यांना आ.गोरेंच्या नादी लागू नकोस असे सांगत तक्रार अर्ज मागे घेण्यास सांगितले तसेच त्या जागेची मुळ कागदपत्रे घेवून पुण्याला ये, त्या ठीकाणी गोसावी व संबधित लोकांना बोलावून घेतो असे सांगितले. त्यानंतर अभंग घाबरलेल्या स्थितीत तेथून बाहेर पडले मात्र, त्यानंतर सातत्याने भोईटे यांनी सपंर्क साधण्याचा प्रयत्न करीत तक्रार अर्ज मागे घेण्यास सांगितले मात्र अभंग यांनी तक्रार अर्ज मागे घेतला नाही. असे सांगून आ.गोरे म्हणाले, अशी स्थिती असताना पनवेल पोलीस ठाण्यात चार महिन्यांपुर्वी दाखल केलेल्या तक्रार अर्जावर चौकशी सुरू असताना प्रसिध्दी देण्यात आली.

वास्तविक या प्रकरणात पोलिसांनी मला चौकशीला बोलावले नसताना मी स्वत:हून तेथे पाच वेळा जावून म्हणने सादर केले आहे. त्याच बरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील विषयाची माहिती दिली आहे. मात्र, सर्वसामान्य घरातील व्यक्ती राजकारणात येवूच नये यासाठी अनेकवेळा ना.रामराजेंनी माझ्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी हस्तक्षेप केला व या ही प्रकरणात केला आहे. त्यांचा हस्तक्षेप कसा चालतो हे फलटण येथील दिगंबर आगवणे यांच्याबाबतीत समोर आला आहे. त्या प्रकरणात ना.रामराजेंमुळे पोलीस अधिकाऱ्यांसह सहा कर्मचाऱ्यांना निलंबित व्हावे लागले आहे. मात्र, ज्या व्यक्तीमुळे प्रकार घडला त्या ना.रामराजेंवर अद्याप गुन्हा दाखल झाला नसून तो तात्काळ दाखल झाला पाहिजे, अशी मागणी आ.गोरे यांनी केली.

कार्यकर्त्यांच्या मदतीला जाणारच
संबधित जमीन प्रकरण कार्यकर्त्यांशी निगडित आहे आणि कार्यकर्त्याला जेव्हा जेव्हा मदत लागेल तेव्हा त्यांच्या मदतीला जाणारच. त्यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल, असे सांगून आ.गोरे म्हणाले, ना.रामराजे यांनी आज आमच्या घरासह साताऱ्यातील घरामध्ये वाद निर्माण केले आहेत. वादामुळे राजकीय लढाया होत राहतील परंतु त्यामुळे हजारो कार्यकर्त्यांवर केसेस दाखल होतात आणि त्यामुळे भविष्यातील गुन्हेगारी पिढी निर्माण करण्याचे काम ना.रामराजे करित आहेत, असे आ.गोरे यांनी सांगितले. तर मोक्का लावण्याची मागणी केलेले डॉ.येळगावकरांना आ.गोरे यांनी बेलायक व्यक्ती म्हणून संबोधित केले तसेच मोक्का हा पत्रकार परिषदा घेवून लागत नसतो, असा टोला त्यांनी डॉ. येळगावकर यांना लगावला.

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)