ना. चंद्रकांत पाटील यांचा सातारा दौरा

सातारा – महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) कृषी व फलोत्पादन मंत्री चंद्रकांत(दादा) पाटील हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे. बुधवार दि. 9 जानेवारी 2019 रोजी सायं. 6.30 वा. सोलापूर येथून वाहनाने कराड येथे आगमन व यशवंत बॅंक आयोजित यशवंत महोत्सवास उपस्थिती (स्थळ: कृष्णाबाई घाट, कराड). रात्री सोयीनुसार जयवंत पाटील यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव (स्थळ : वाखन रोड, कराड).

रात्री सोयीनुसार अशोक थोरात यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव (स्थळ : खंडोबा नगर, मलकापूर, ता. कराड). रात्री सोयीनुसार कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमधील गेस्टहाऊस, मलकापूर कराड येथेआगमन व राखीव. रात्री सोयीनुसार वाहनाने कराड शासकीय विश्रामगृह कराडकडे प्रयाण आगमन व मुक्काम. गुरुवार दि. 10 जानेवारी रोजी सकाळी 9.45 वा. कराड शासकीय विश्रमागृह येथून वाहनाने मलकापूर, ता. कराडकडे प्रयाण. सकाळी 10 वा. मलकापूर, ता. कराड येथे आगमन व विविध मान्यवरांच्या भेटीसाठी राखीव. दुपारी सोयीनुसार वाहनाने इस्लामपूर ता. वाळवा, जि. सांगलीकडे प्रयाण.सायं. 5.30 वा. इस्लामपूर येथून मलकापूर ता. कराड येथे आगमन व विविध मान्यवरांच्या भेटीसाठी राखीव. रात्री 7.30 वा. मलकापूर ता. कराड येथून वाहनाने पुणेकडे प्रयाण.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)