“ना काम ना दाम’ तत्त्वानुसार एसटी कामगारांच्या पगारात होणार कपात

नगर – एसटी कामगारांनी वेतनवाढ मान्य नसल्याने 8 व 9 जूनला अघोषित संप पुकारला होता. या संप काळात गैरहजर राहणाऱ्या एसटी कामगारांची ना दाम ना काम या तत्त्वानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकाच्या आदेशाने पगार कपात होणार आहे. त्यामुळे एसटी कामगारांमध्ये संताप व्यक्‍त आहे.
संपकाळात कामावर गैरहजर राहिलेल्या कामगारांचा 9 ते 10 दिवसांचा पगार “ना काम ना दाम’ या तत्त्वानुसार देण्यात येऊ नये. असे आदेश 28 जून रोजी राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक माधव काळे यांनी जारी केले आहेत.
वेतनासंदर्भात दर चार वर्षांनी एसटी कामगारांच्या वेतनवाढीचा करार करण्यात येत असतो. एसटी कामगारांनी पगारवाढीच्या मुद्दयावरुन मागील काळात ऐन दिवाळीत संप पुकारला होता. परंतु, त्यावेळी न्यायालयाच्या आदेशाने संप मागे घेण्यात आला होता. त्यानंतर मान्यताप्राप्त संघटना आणि रापमं प्रशासनाच्या बैठका सुरू होत्या. पण सन्मानजनक तोडगा निघत नसल्याने 8 जूनला कामगारांनी अचानक संप पुकाल्याने रापमं प्रशासनाने तातडीने दखल घेत, परिवहनमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा काढून संप मागे घेण्यात आला. परंतु, जे एसटी कर्मचारी संपकाळात गैरहजर राहिले होते. त्यांच्या पगारात रापमं प्रशासन कपात करणार असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्‍त केला आहे. दोन दिवसात तो मागे घेण्यात आल्यानंतर संपात सहभागी राज्यातील 1 हजार 10 कामगारांची सेवा खंडित करण्याची कारवाई केली गेली मात्र वाढता दबाव लक्षात घेऊन ती कारवाई मागे घेण्यात आली.

नऊ ते दहा दिवसांच्या पगाराला कात्री
28 जून रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकाने दोन दिवसाच्या संपकाळात गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचे आदेश दिले आहेत. गैरहजर दिवासांची पगार कपात माहे जुलै 2018च्या पगारातून आणि उर्वरित 9 ते 10 दिवसांची पगार कपात माहे ऑगस्ट महिन्यापासून प्रत्येक महिन्यास एक दिवसाप्रमाणे करावी, असे या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे एसटी कामगारांच्या पगाराला कात्री लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)