होर्डिंग दुर्घटना : …नाहीतर 25 बळी गेले असते

प्रत्यक्षदर्शींचे अनुभव : 20 सेकंदाचा फरक पडला

पुणे – सिग्नल लागून काहीच सेकंद झाले आणि ही दुर्घटना घडली. या सहा रिक्षा तेथे येऊन उभ्या राहिल्या. जर 15-20 सेकंदांनी ही घटना घडली असती किमान बळींची संख्या 25 असती असा अंगावर अक्षरश: भीतीचा काटा आणणारा अनुभव प्रत्यक्षदर्शींनी सांगितला.

-Ads-

शाहीर अमर शेख चौकात कायमच आरटीओ, पुणे स्थानक येणाऱ्या आणि महापालिकेकडून येणाऱ्या वाहनांची प्रचंड वर्दळ असते. या चौकात मोठा सिग्नलही आहे. जेथे ही दुर्घटना घडली त्या आरटीओकडून शाहीर अमरशेख चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावरील सिग्नल लागून काहीच सेकंद झाले होते. त्यामुळे या सहा रिक्षा पाठोपाठ येऊन थांबल्या आणि तत्क्षणी हे होर्डिंग त्यावर कोसळले. काही सेकंद पुढे गेले असते, तर मागून येणारे दुचाकीस्वार, चारचाकी आणि अन्य वाहनांची संख्या तेथे वाढली असती आणि या दुर्घटनेची व्याप्ती काही वेगळीच आणि भयावह असती. त्यामुळे अक्षरश: हा अनुभव अंगावर काटा आणणारा आणि प्रत्यक्षात मृत्यू समोर पाहून थरकाप उडवणारा ठरला.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)