न्यूयॉर्क : अखंड ऊर्जा आणि प्रकाश पुरवणारा तारा असलेल्या सूर्यावरील वातावरणाबद्दल मानवाची प्रचंड जिज्ञासा आहे. पण,आता या जिज्ञासांचे उत्तर शोधण्यासाठी नासा या अंतराळ संशोधन संस्थेने सूर्यावर स्वारी करण्याचे ठरवले आहे. येत्या ३१ जुलै रोजी नासाचे सौरयान उड्डाण घेणार आहे.  या पार्कर सोलर प्रोब मिशनची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

सध्या हे यान फ्लोरिडाला स्पेस सेंटरवर पोहोचले आहे. तिथे यानाची महत्वाची चाचणी सुरू आहे. इजीन पार्कर या ९० वर्षीय खगोलशास्त्रज्ञाने सौर वादळांसंदर्भात सर्वप्रथम अंदाज वर्तवला होता. त्यांच्या सन्मानार्थ या मोहिमेतील यानाला ‘पार्कर सोलर प्रोब’ असे नाव देण्यात आले आहे. एका छोट्या कारच्या आकाराचे हे अंतराळयान असेल, असे नासाने म्हटले आहे. सूर्याचा करोना हा त्याच्या पृष्ठभागापेक्षा अधिक उष्ण का, यासारख्या अनेक महत्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे यातून मिळणार आहेत, असे संशोधकांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)