नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक

आचारसंहिता कक्ष, मीडिया कंट्रोल ऍण्ड सर्टिफिकेशन समितीची स्थापना
नगर – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आचारसंहिता कक्ष, मीडिया कंट्रोल ऍण्ड सर्टिफिकेशन समितीची स्थापना केली आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आलेली होती. आता नव्याने निवडणूक आयोगाद्वारे दि. 24 मे रोजी शिक्षक मतदारसंघाचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त राजाराम माने हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार असून, निवडणुकीसाठी विभागातील पाचही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. 25 जूनला मतदान, तर 28 जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जारी करण्यात आली आहे.
दरम्यान, निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी विविध कक्षाची स्थापना केली आहे. आचारसंहिता कक्षाचे समन्वय अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित काम पाहणार असून, सहायक अधिकारी तहसीलदार एफ. आर. शेख व नायब तहसीलदार सुनील पाखरे, अव्वल कारकून एस. एन. घोंगडे, लिपिक नेमाणे यांची या कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे. व्हिडिओग्राफी कक्षाचे प्रमुख म्हणून तहसीलदार एस. सी. शेलार यांची नियुक्ती केली असून, लिपिक विजय कवडे हे सहायक अधिकारी असणार आहेत. माध्यमांना निवडणूक विषयक माहिती देण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, तर सहायक म्हणून सुधीर पवार व संतोष गुजर यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. या निवडणुकीबाबत विविध माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी जिल्हा सूचना अधिकारी सीमा भणगे आणि सहायक जिल्हा सूचना अधिकारी जी. एन. नकासकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गाडेकर, देशपांडे, खराडे, चव्हाण यांची समितीवर नियुक्ती
नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हास्तरावर मीडिया कंट्रोल ऍण्ड सर्टिफिकेशन समितीची स्थापना केली आहे. जिल्हाधिकारी या समितीचे पदसिद्ध अधिकारी आहे. समितीचे सदस्य म्हणून उपविभागीय दंडाधिकारी उज्ज्वला गाडेकर, ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडेमहाराज, आकाशवाणी केंद्रप्रमुख बाबासाहेब खराडे आणि जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)