नाशिक फाटा येथील अपघात वैयक्‍तिक चुकीमुळे

महामेट्रो प्रशासनाकडून घटनेची चौकशी पूर्ण


चालकाला कामावरून काढले, ठेकेदाराला दंड

पुणे – नाशिक फाटा येथे मेट्रोचे काम सुरू असताना पायलिंग रिंग कोसळून झालेल्या घटनेची प्रकल्प संचालक व मुख्य प्रकल्प व्यवस्थापक यांच्या समितीने चौकशी पूर्ण केली आहे. ही घटना पायलिंग रिंग चालकाच्या वैयक्तिक चुकीमुळे घडली असून संबंधिताला कामावरून काढले असून कंत्राटदाराला ताकीद व दंड ठोठवल्याची माहिती महामेट्रो प्रशासनाने दिली आहे.

पायलिंग रिंग कोसळल्याच्या घटनेनंतर महामेट्रोने पुणे आणि पिंपरी-चिंचवड हद्दीत सुरू काम असलेल्या ठिकाणी सुरक्षा आढावा घेतला आहे. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून संबंधितांना सूचना दिल्या असून नवीन सुरक्षा मानके निर्धारित केली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत वेगेवेगळ्या 136 यंत्रांचा वापर करण्यात येत आहे. नाशिक फाट्याची घटना अपवादात्मक असून पुणे मेट्रोने या घटनेची पूर्ण चौकशी करून संबंधितांना सूचना दिल्या आहेत. ठेकेदारांना नोटीस पाठविली असून दंड ठोठावला आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्प साकारण्यासाठी 11 पायलिंग रिंग, 7 लॉचिंग गर्डर, 24 हायड्रा मशीन, 8 रोड क्रेन,26 एव्क्‍सवेटर व पोकलेन मशीन, 49 डम्पर ट्रेलर, 11 गॅंट्री क्रेन आदी यंत्रे कार्यरत आहे. या यंत्रांची वेळोवेळी देखभाल करण्यात येत असून अपघात टाळण्यासाठी यंत्रचालकांचे परवाना व वैद्यकीय तपासण्या नियमित करण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)