नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये छपाई बंद 

शाईचा तुटवडा : रोकड टंचाईशी संबंध नसल्याचा सरकारचा दावा 
नाशिक – देशातील काही राज्यांमध्ये रोकड टंचाई निर्माण झाली असतानाच नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये छपाई बंद असल्याची धक्‍कादायक माहिती मिळत आहे. या करन्सी नोट प्रेसमध्ये 20, 100, 200 आणि 500 च्या नोटांची छपाई जवळपास बंद आहे. त्यामुळे रोकड टंचाई आणखी काही दिवस जाणवण्याची शक्‍यता आहे. केंद्र सरकारने 20 आणि 100 च्या नोटांचे नवीन डिझाईन मंजूर न केल्याने नोटांची छपाई थांबली आहे, तर 200 आणि 500च्या नोटांच्या छपाईसाठी लागणाऱ्या शाईचा तुटवडा असल्याने नोटांच्या छपाईवर त्याचा परिणाम झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, मार्चपर्यंतच्या स्टॉकची छपाई पूर्ण झालेली आहे. मात्र एप्रिलपासूनची ऑर्डर न आल्याने पुढील छपाई बंद आहे, असेही काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकारी दिरंगाईचा परिणाम स्वाभाविकपणे नोटांच्या छपाईवर झाला आहे. तर ही छपाई बंद होणे आणि सध्याची रोकड टंचाई यांचा संबंध नसल्याचा दावाही केला जात आहे. देशातील नाशिक (महाराष्ट्र), देवास (मध्य प्रदेश), सालबोनी (पश्‍चिम बंगाल) आणि म्हैसूर (कर्नाटक) या चार ठिकाणी नोटांची छपाई होते. नाशिकमध्ये दररोज साधारणपणे पाच दशलक्ष नोटा छापल्या जातात. या नोटा देशभरात पुरवल्या जातात. विविध किंमतींच्या वेगवेगळ्या चलनी नोटांसाठी वेगळ्या प्रकारच्या शाईचा वापर केला जातो आणि ही शाई परदेशातून येते.

-Ads-

दरम्यान, महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये काही ठिकाणी एटीएममध्ये खडखडाट जाणवत आहे. नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या स्थितीप्रमाणे अनेक भागात नागरिकांना पैसांसाठी वणवण भटकावे लागत आहे. मात्र नोटाबंदीनंतर (8 नोव्हेंबर 2016) असलेल्या चलनाच्या तुलनेत सध्या बाजारात अनेक पटीने नोटा असल्याचा दावा सरकारने केला आहे. नोटाबंदीच्या वेळी 17.5 लाख कोटींपेक्षा जास्त रोकड चलनात होती, तर सध्या 18 लाख कोटींच्या पार रक्कम चलनात आहे, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सध्या व्यवस्थेत 6.7 लाख कोटींपेक्षा जास्त रकमेच्या दोन हजार रुपयांच्या नोटा उपलब्ध आहेत. ही रक्कम आवश्‍यकतेपेक्षा जास्त आहे. म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून दोन हजाराच्या नव्या नोटांचा पुरवठा थांबवण्यात आला, अशी माहिती आर्थिक विषयांचे सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी दिली. दोन हजाराच्या नोटांची साठवणूक होत असल्याची शक्‍यता गर्ग यांनी नाकारली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)