नाशिक – नाशिकमध्ये पावसाच्या पुनरागमनासोबतच साथींचे आजारही फोफावत आहेत. नाशिक शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून दिवसाला सरासरी पाच रुग्ण आढळून येत आहेत. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत 75 हून अधिक जणांना डेंग्यूची लागण झाली आहे.

8 ते 14 ऑगस्ट या कालवधीत डेंग्यूचे तब्बल 47 रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत 991 डेंग्यू संशयित रुग्ण आढळून आले असून, 296 जणांना लागण झाली आहे. तर चिकनगुनियाचे आतापर्यंत 25 रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून “स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’चे कितीही दावे केले जात असले, तरीही शहरातील रुग्णाच्या संख्येवरुन प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभ राहत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)