नाशिकमध्ये माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला 

नाशिक – नाशिकमधील कॉंग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. हा प्रकार परिसरातीलच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. नाशकातील द्वारका परिसरात असलेल्या दलोड यांच्या कार्यालयाजवळ शनिवारी रात्री पप्पू तसंबड, पिंटू तसंबड आणि सोनू साळवे या तिघांनी दलोड यांच्यावर चॉपर आणि लाकडी दंडक्‍याने हल्ला केला.

विशेष म्हणजे त्यांना वाचवण्यासाठी आलेला त्यांचा मुलगा सिद्धार्थ आणि भाच्यालाही त्यांनी बेदम मारहाण केली होती. या घटनेत सुरेश दलोड हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या तिघांच्याही मुसक्‍या आवळल्या.

दरम्यान, नाशकातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे पडसाद भद्रकाली परिसरात उमटले आहेत. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असून यामागे आणखी काही कारणे आहेत का, याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)