नाशिकमध्ये तीन मजली वाडा कोसळला 

संग्रहित छायाचित्र
नाशिक: जुन्या नाशिक भागातील तांबट गल्लीत एक तीन मजली जीर्ण वाडा आज कोसळला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली किमान 4 ते 5 लोक अडकले असण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.
घटनास्थळी बचावपथकाने धाव घेतली असून एका रहिवाशाला अत्यवस्थ अवस्थेत बाहेर काढण्यात यश आले आहे. अग्निशामक दलाचे चार बंब आणि 10 ते 15 कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. मात्र, मधूनच पावसाची भुरभुर होत असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे.
तांबट गल्लीत एक तीन मजली जुना जीर्ण झालेला वाडा आहे. आज दुपारी एकच्या सुमारास अचानक या वाड्याचे दोन मजले जमीनदोस्त झाले. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 4 ते 5 लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एका व्यक्तीला बाहेर काढण्यात यश आले असून उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)