नाशिकमध्ये कामाच्या ताणामुळे मनपा अधिकाऱ्याची आत्महत्या

नाशिक – नाशिक महापालिकेतील अधिकाऱ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संजय धारणकर यांनी कामाच्या ताणामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला आहे.

संजय धारणकर हे घरपट्टी विभागात सहाय्यक अधीक्षक पदावर कार्यरत होते. नाशकातील गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर जवळ ऋषिराज पार्कमध्ये धारणकर राहत होते. मात्र आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

-Ads-

पोलिसांना मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये “कामाच्या ताण तणावामुळे मी सोडून जातोय’ असा उल्लेख आहे. दीर्घ रजेनंतर ते कामावर रुजू झाले होते. धारणकरांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे पालिकेत खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा गंगापूर पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)