नाशिकमध्ये अनैतिक प्रेमसंबंधातून तिघींना पेटवले

9 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू
नाशिक – नाशिकमध्ये अनैतिक प्रेम संबंधातून जळीतकांड घडले. आरोपीने दोन महिलांसह एका चिमुकलीला पेटवले असून यात नऊ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना नाशिकच्या पंचवटी परिसरात मध्यरात्री घडली.

देवरे नावाच्या महिलेचे परिसरातीलच एका परप्रांतीय इसमासोबत प्रेमसंबंध होते. या महिलेची 19-20 वर्षांची मुलगी तिच्या नऊ महिन्यांच्या बाळासह इथे राहायला आली होती. परंतु किरकोळ भांडणातून महिलेचे आणि आरोपीचे भांडण झाले.

याच रागातून आरोपीने मध्यरात्री तिघींच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले. यात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर आगीत भाजलेल्या महिलांवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)