नाशिकजवळ सुखोई विमान कोसळले

नाशिक – भारतीय हवाईदलात लवकरच समावेश केले जाणारे देशी बनावटीचे सुखोई हे लढाऊ विमान काल नाशिकजवळ एका शेतात कोसळले. यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. विमान कोसळण्यापुर्वीच विमानातील दोन्ही वैमानिकांनी पॅराशुटच्या सहाय्याने आपली सुटका करून घेतली. हे विमान सु-30 एमकेआय जातीचे होते.

हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स कंपनीने ते तयार केले आहे. नाशिक जिल्ह्यातील वावी-ठुशी गावाजवळ ते कोसळले. हे ठिकाण नाशिक पासून 25 किमी अंतरावर आहे. नाशिकच्या विमानतळावरून या विमानाने काल नेहमीप्रमाणे सरावासाठी उड्डाण केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताने रशियाशी या विमानाच्या उत्पादनाच्या संबंधात करार केला आहे. त्यानुसार हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स कंपनीत पहिल्या 12 विमानांचे उत्पादन सुरू आहे त्यातील हे पहिले विमान आहे. अपघातग्रस्त विमानाच्या याआधीच्या सर्व चाचण्या पुर्ण झाल्या आहेत. हे विमान लवकरच भारतीय हवाईदलात सामील केले जाणार होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)