नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली 

नाशिक: शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असणारे तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्याजागी राधाकृष्ण गमे यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अद्याप बदलीबाबत कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाही, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

तुकाराम मुंढे यांच्या शिस्तबद्ध, नियमाधारित कामांच्या दंडकामुळे नाशिकमध्ये सत्ताधारी भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा प्रयत्नही सत्ताधारी भाजपाने केला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले.

-Ads-

मात्र, तुकाराम मुंढे यांनी नियमावर बोट ठेवत काम सुरुच ठेवले. त्यांच्या या कार्यशैलीमुळे सत्ताधाऱ्यांसह सर्वपक्षीय नगरसेवकांच्या अडचणी वाढल्या होत्या. दरम्यान, नाशिकमध्ये बुधवारी दिवसभर तुकाराम मुंढे यांच्या बदलीची चर्चा रंगली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)