नाशकात 574 अनधिकृत धार्मिक स्थळे पालिकेच्या रडारवर

नाशिक – नागपूरनंतर आता नाशिक शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. नाशिक महापालिकेला शहरातील अनधिकृत धार्मिकस्थळांबाबतचे प्रतिज्ञापत्र 13 ऑगस्टपर्यंत उच्च न्यायालयात सादर करायचे आहे.

महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानंतर खुल्या जागेवरील 574 धार्मिक स्थळे हटवली जाण्याची शक्‍यता आहे. दीड वर्षांपूर्वी नागरिकांचा रोष झुगारुन महापालिकेकडून अशाच स्वरुपाची कारवाई शहरात करण्यात आली होती. त्यानंतर काही संघटनांनी न्यायालयातून स्थगिती मिळवली होती.

-Ads-

आता पुन्हा एकदा अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम हाती घेतली जाणार असल्याने धार्मिक संघटना सक्रिय झाल्या आहेत. महापालिकेने चुकीचे सर्वेक्षण केल्याचा आरोप केला जात आहे. कुठल्याही परिस्थितीत धार्मिक स्थळांना हात लावू देणार नसल्याचा इशारा संबंधित संघटनांनी दिला असून त्या न्यायालयात दाद मागणार आहेत.

यापूर्वी नागपुरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर उच्च न्यायालयाने कारवाईचा इशारा दिला होता. उच्च न्यायालयाने 967 मंदिरांना तूर्तास दिलासा देत 50 हजार रुपये भरण्याचे आदेश दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)