नाशकात स्वाईन फ्ल्यूचे थैमान

चोवीस तासात तिघांचा मृत्यू : आतापर्यंत 23 जणांचा बळी
नाशिक – नाशिक शहरासह ग्रामीण भागात स्वाईन फ्ल्यूचा प्रसार वेगाने वाढत असून या रोगाने जिल्ह्यात अक्षरशः थैमान घातले आहे. गेल्या 24 तासात स्वाईन फ्ल्यूसदृश आजाराने तिघांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या 23 वर पोहोचली आहे.
शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूम सुरु असताना या गणेशोत्सवावर स्वाईन फ्ल्यूसह साथीच्या आजारांचे सावट आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानात झालेल्या बदलामुळे स्वाईन फ्ल्यू फोफावला असून रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जुलै महिन्यापासूनच हा आजार अधिक बळावत आहे.

गेल्या दीड-दोन महिन्यात जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूसदृश आजाराने 20 रुग्णांचा मृत्यू झाला, तर 100 हून जास्त जणांना लागण झाली. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या 18, तर जिल्ह्यातील इतर रुग्णलयांमध्ये 35 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वाईन फ्ल्यूच्या औषधावरचे एफडीएचे निर्बंध हटवण्यात आल्याने मेडिकल स्टोअर्समध्ये औषधसाठा उपलब्ध झाला असून, जिल्हा रुग्णलयात 40 हजाराहून अधिक टॅमी फ्ल्यूच्या गोळ्या उपलब्ध झाल्या आहेत. ग्रामीण रुग्णालयातही या गोळ्यांचा पुरवठा सुरू आहे.

नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, सर्दी-खोकला, घशात खवखव सुरु झाल्यास डॉक्‍टरचा सल्ला घेण्याचे आवाहन जिल्हा रुग्णालयाकडून करण्यात आला आहे. याशिवाय खासगी डॉक्‍टरांनी संशयित रुग्ण दाखल झाल्यावर इतर उपचाराप्रमाणे स्वाईन फ्ल्यू प्रतिबंधित औषधांचा मारा सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

मागील 15 दिवसांत नाशिकच्या जिल्हा रुग्णलयाला आरोग्य मंत्री, आरोग्य संचालक यांनी भेट देऊन स्वाईन फ्ल्यू परिस्थितीचा आढावा घेतला होता. यंत्रणेला सूचना केल्या होत्या. मात्र त्याचा अद्याप काही उपयोग झाला नसल्याचं आकडेवारीवरुन निष्पन्न होत असल्याने, आता नागरिकांनीच अधिक सजग राहण्याची गरज असल्याचे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)