नाशिक – भावडबारी-देवळा मार्गावर नंदुरबार-नाशिक एसटी बसचा मंगळवारी दुपारी भीषण अपघात झाला आहे. एसटी बसने कंटेनरला धडक दिली असून या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू, तर 15 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर देवळा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. अपघातानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. त्यानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी जखमींना देवळा आणि चांदवड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

अपघात इतका भीषण होता की, यामध्ये बसचे मोठे नुकसान झाले असून एका बाजूने बस पूर्णपणे फाटली आहे. हा अपघात झाला तेव्हा चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहूल आहेर त्या मार्गाने देवळ्याकडे जात होते. त्यांनी लगेच मदतकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)