नाशकात चौघींचा पाण्यात बुडून मृत्यू

नाशिक – बंधाऱ्यावर भांडी धुण्यासाठी गेलेल्या चार महिलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना नाशिकमधील सातपूर परिसरात घडली. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एकाच कुटुंबातील चौघींचा मृत्यू झाल्याने सातपूरमध्ये शोककळा पसरली आहे.

मनीषा शिंदे, वृषाली शिंदे, ऋतुजा शिंदे आणि आरती शिंदे अशी मृतांची नावे आहेत. महाराष्ट्रात सर्वत्रच बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात येत असतानाच नाशिकमध्ये मात्र दुःखद घटना घडली आहे. सातपूरच्या बेळगाव ढगा परिसरात शिंदे नामक कुटुंब राहत असून, सकाळी त्यांच्या घरी वाजत गाजत बाप्पाचे आगमन झाले. दुपारी मनीषा शिंदे या आपल्या दोन लहान मुलींसह सूनेला घेऊन भांडी घासण्यासाठी जवळ असलेल्या बंधाऱ्यावर भांडी धुण्यासाठी गेल्या होत्या. काम आटोपल्यावर पाय धुवत असतानाच एका मुलीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली आणि तिला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर तिघीही बुडाल्या.

विशेष म्हणजे, घरातीलच एक लहान मुलगी हा सर्व प्रकार बघून घरातील इतर सदस्यांना माहिती दिली आणि स्थानिक नागरिकांसह परिवारातील इतर सदस्यांनी इथे धाव घेतली. त्यानंतर त्यांचा शोध घेऊन चारही जणींना बाहेर काढण्यात आले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूच्या नोंदणी करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)