नाशकात एक हजार किलो गांजा जप्त

नाशिक – नाशिक गुन्हे शाखा 1 च्या पथकाने दोन दिवसांत सुमारे एक हजार किलोपेक्षा जास्त गांजा जप्त केला आहे. विशेष म्हणजे यापैकी 400 किलो गांजा हा गोठ्यातून जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे एमडी ड्रग्स पाठोपाठ गांजा खरेदी-विक्री करणारे रॅकेट येथे कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय बलावला आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाला नाशिकमध्ये गांजा घेऊन एक वाहन मंगळवारी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पंचवटीतील तपोवन परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका ट्रकवर संध्याकाळी कारवाई करण्यात आली. हा ट्रक उदिशावरुन माल घेऊन शहरात दाखल झाला होता. या ट्रकमधून पोलिसांनी 34 लाख रुपये किंमतीचा 680 किलो गांजा जप्त केला. या कारवाईत यतीन शिंदे आणि सुनील शिंदे या दोघांना पोलिसांनी अटक केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच पोलिसांनी आज संध्याकाळी सिन्नर परिसरातील एका गोठ्यावर छापा टाकून जवळपास 400 किलो गांजा जप्त करत एकास ताब्यात घेतले. दोन दिवसांत एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा सापडल्यामुळे नाशिक शहरात एकच खळबळ उडाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)