नाळेतील रक्‍तामधल्या मूळ पेशी : अम्बिलिकल कॉर्ड ब्लड स्टेम सेल्स 

डॉ. राहुल भार्गव 

डॉ. सत्य प्रकाश यादव 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अम्बिलिकल कॉर्ड ब्लडच्या उपलब्धतेवर रक्ताशी संबंधित आजारांचे उपचार अवलंबून अम्बिलिकल कॉर्ड ब्लड (यूसीबी)चे प्रत्यारोपण (यूसीबीटी) सर्वप्रथम 1988 मध्ये फ्रान्समध्ये करण्यात आले. तेव्हापासून विविध प्रकारच्या दूषित व घातक रक्ताशी संबंधित आजारांसाठी (हिमॅटोलॉजीकल) या प्रक्रियेचा वापर मोठ्या प्रमाणावर स्वीकारण्यात आला. एक प्रभावी उपचार म्हणून हा प्रयोग सर्वत्र वापरला जाऊ लागला आहे. मात्र, हे रक्त स्वतःच्या वापरासाठी साठविण्यात येते. ते सार्वजनिक बॅंकांमध्ये साठविल्यास त्याचा सर्वाना उपयोग होईल.

एका अभ्यासानुसार, ल्यूकेमियासारख्या आजारामध्ये पारंपरिक बोन मारो ट्रान्सप्लांट (बीएमटी)च्या ऐवजी यूसीबीटी अधिक प्रभावी ठरली आहे. यासंदर्भात, वर्ष 2016 मध्ये न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार, कॉर्ड ब्लड ट्रान्सप्लांट उपचार देण्यात आलेल्या ल्युकेमिया रुग्णांना, बाहेरच्या दात्याकडून देण्यात आलेल्या स्टेम सेल थेरपीच्या तुलनेत अधिक चांगले परिणाम आणि पुन्हा हा आजार होण्याची कमी शक्‍यताम्‌ हे गुण आढळून आले आहेत.

हे निष्कर्ष खरोखरच अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. रक्ताशी संबंधित आजारांचे देशातील वाढते प्रमाण लक्षात घेता, यूसीबी ट्रान्सप्लाटच्या प्रभावी वापराकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. याच्या वापराबाबत गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.

अनेकदा रक्ताशी संबंधित आजारात अम्बिलिकल कॉर्ड ब्लड वापरताना एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तिचे कॉर्ड ब्लड देण्याचा सल्ला दिला जातो. त्या व्यक्तिचे स्वत:चे ब्लड वापरण्यास सांगितले जात नाही. कारण, काहीवेळा आजाराला कारणीभूत ठरलेले जीन्सही त्याच व्यक्तिच्या कॉर्ड ब्लडमध्ये असू शकतात. उपचारांकरिता निरोगी पेशींची गरज असते.
या ब्लडचा वापर आतापर्यंत 80 विविध प्रकारच्या आजारांवरील उपचारांसाठी करण्यात आला आहे. लवकरच जागतिक संशोधनानुसार त्याचा वापर 300 पेक्षा अधिक कारणांसाठी केला जाईल. या बाबी विचारात घेता, कॉर्ड ब्लड बॅंकासाठी सार्वजनिक बॅंकांचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने या रक्तपेशी नियमितपणे वाया घालवल्या जात आहेत.

एका आकडेवारीनुसार, देशभरात 10 हजार बालके दरवर्षी थॅलेसिमिया हा आजार घेऊन जन्मतात. एका अंदाजानुसार थॅलेसिमिया रुग्णांची संख्या 2020 पर्यंत एक लाख 32 हजार 574 इतकी वाढणार आहे. अपॅलिस्टिक ऍनिमिया आणि सिकल सेल ऍनिमिया यासारखे रक्ताशी संबंधित आजारही देशात आता सर्वसाधारण आजार म्हणून गणले जाऊ लागले आहेत.

याचा अर्थ असा नाही, की पालकांना कॉर्ड ब्लड बॅंकांमध्ये ठेवायचे नाही. पालक खासगी बॅंकांना प्राधान्य देत आहेत, ही बाब विचार करायला लावणारी आहे.

गेल्या काही दशकांमध्ये भारतात पाच लाख कॉर्ड ब्लड युनिट्‌स खासगी बॅंकांमध्ये संरक्षित करण्यात आले आहे. दुर्दैवाने, या रक्ताचा वापर रक्ताशी संबंधित आजारांमध्ये योग्यवेळी क्वचित होऊ शकतो. असे आजार कमी करण्यात हे युनिट्‌स मोठी भूमिका बजावू शकतात.

अम्बिलिकल कॉर्ड ब्लड (यूसीबी) :
अर्भकाच्या जन्मावेळी त्याच्या नाळेतून काढण्यात येणारे मूळ पेशीयुक्त रक्त. या रक्तातील पेशी जतन केल्या जातात. अत्याधुनिक संशोधनानुसार या पेशी किंवा हे रक्त त्या बाळाला भविष्यात एखादा मोठा आजार झाल्यास उपचारांसाठी वापरले जाते.

पब्लिक कॉर्ड ब्लड बॅंक कशासाठी? 
अलीकडच्या काळात कॉर्ड ब्लड बॅंकांना अधिक मान्यता मिळत असली तरी, अनेकांना खासगी आणि पब्लिक कॉर्ड ब्लड बॅंकिंगमधला फरक लक्षात येत नाही आणि त्यातील चांगले काय आहे, हे समजत नाही तज्ज्ञांच्या मते, खासगी कॉर्ड ब्लड बॅंका या फक्त स्वत:च्या वापरासाठी असतात आणि त्यांचा वैद्यकीय उपचारांसाठी खूपच कमी वापर केला जातो कारण, रक्ताशी संबंधित अनेक आजारांमध्ये यूसीबीटीसाठी स्वत:ऐवजी दुसऱ्या व्यक्तिचा पर्याय दिला जातो. एकाच ठिकाणी कॉर्ड ब्लड उपलब्ध झाल्यास आवश्‍यकतेप्रमाणे त्याचा वापर इतरांसाठी करता येऊ शकतो.

आयसीएमआरच्या 2007 आणि 2012 च्या मार्गदर्शक तत्वानुसार, “साठविलेल्या अम्बिलिकल कॉर्ड ब्लडचा स्वत:साठी उपयोग करणे एकप्रकारे शून्यवत आहे,’ आणि 2017 च्या मार्गदर्शक तत्वानुसार, ‘कॉर्ड ब्लड हे भविष्यात स्वत:च्या वापरासाठी साठविण्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, तर या प्रॅक्‍टिसबाबत नैतिक आणि सामाजिक प्रश्‍न उपस्थित करता येऊ शकतात.

मायकॉर्ड – हा सेल्युजेन बायोटक कंपनीचा एक विभाग आहे. यामध्ये स्टेम सेल्सवर संशोधन करण्यात येते. यातील तज्ज्ञांनी सर्वप्रथम नोव्हेंबर 2016मध्ये पूल बॅंकिंगची संकल्पना मांडली. या संकल्पनेने वैद्यकीय विश्‍वात मोठा बदल घडवून आणला आहे. सेल्युजेन, ही भारत सरकार मान्यताप्राप्त पूल बॅंक तयार करत असून त्याद्वारे पालक त्यांच्या मुलांवरील उपचारांसाठी कॉर्ड ब्लडचा उपयोग करू शकतील. तसेच कॉर्ड युनिट मिळवून देण्यात येणारे अडथळे दूर करेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)