नाले बांधण्यासाठी दीड कोटी खर्च

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे प्रभाग क्रमांक 19 आणि प्रभाग क्रमांक 21 मध्ये ठिकठिकाणी नाले बांधण्यात येणार आहेत. प्रभाग क्रमांक 19 मध्ये बांधण्यात येणाऱ्या नाल्यासाठी 74 लाख रुपये तर, प्रभाग क्रमांक 21 मधील नाल्यासाठी 75 लाख रुपये असा एकूण 1 कोटी 49 लाख रुपये खर्च येणार आहे. या खर्चाच्या ऐनवेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीत मान्यता देण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक 19 मध्ये नाले बांधण्यासाठी पालिकेच्या वतीने निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यासाठी मे. कविता एन्टरप्रायजेस, मे. सुयोगराज कंन्स्ट्रक्‍शन, मे. श्रीरंग इन्फ्रा, मे. व्यंकटेशश्वरा कन्स्ट्रक्‍शन, मे. एल. एन. एन्टरप्रायजेस, मे. पी. ऍन्ड बी. कंन्स्ट्रक्‍शन, मे. एम. जे. कन्स्ट्रक्‍शन अशा सात निविदा प्राप्त झाल्या होत्या.

-Ads-

त्यापैकी मे. कविता एन्टरप्रायजेस या ठेकेदाराची निविदा रकमेच्या 74 लाख 8 हजार 457 पेक्षा 33.01 टक्के कमी दराची होती. तुलनात्मकदृष्ट्या वाजवी दराची असल्याने आणि ठेकेदार मुदतीमध्ये हे काम करण्यास सक्षम असल्याने त्यांची निविदा स्वीकारण्यास आयुक्तांनी 6 जून 2018 रोजी मान्यता दिली होती. त्यानुसार मे. कविता एन्टरप्रायजेस या ठेकेदाराकडून निविदा मंजूर दराने 49 लाख 62 हजार 925 रुपयांपर्यंत काम करुन घेण्यास तसेच निविदेतील निविदा अटीप्रमाणे भाववाढ कलमानुसार मटेरियलच्या निर्धारीत केलेल्या बेसीक दरामध्ये कंत्राट कालावधीमध्ये झालेली वाढ, घट दरानुसार फरकाची रक्कम अदा, वसूल करणे बंधनकारक राहील. या अटीस राहून त्यांच्याबरोबर करारनामा करण्यात आला आहे.

प्रभाग क्रमांक 21 मधील नाले बांधण्याच्या कामासाठी सहा निविदा प्राप्त झाल्या होत्या. मे. कविता एन्टरप्रायजेस या ठेकेदाराची निविदा 75 लाख 13 हजार 341 पेक्षा 33.11 टक्के कमी दराची आहे. त्यामुळे ती स्वीकृत करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)