नालेगाव, केडगावात 840 घरकुलांना मंजुरी

राज्य सरकारकडून महापालिकेला पाच कोटींचा पहिला हप्ता वर्ग

नगर – नालेगाव व केडगाव येथील 840 घरकुलांचा प्रकल्प केंद्र सरकारकडून मंजूर झालेला असून, या प्रकल्पासाठी महापालिकेला अनुदानही मंजूर करण्यात आले आहे. त्यातील 5 कोटी 4 लाख रुपयांचा पहिला हप्ता महापालिकेला वर्ग करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. दरम्यान, मनपाकडे अनुदान प्राप्त होताच या प्रकल्पाच्या कामासाठी निविदा मागविण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मागील वर्षी महापालिकेला भागीदारी तत्वावर परवडणाऱ्या घरांसाठी 840 घरकुलांचा प्रकल्प मंजूर झालेला आहे. एकूण 65.93 कोटींचा हा प्रकल्प आहे. मात्र, त्यासाठी केंद्राकडून निधी उपलब्ध झालेला नव्हता. केडगाव येथे 624 घरकुलांचा प्रकल्प उभारला जाणार असून, नालेगाव येथे 216 घरकुलांचा प्रकल्प साकारला जाणार आहे. यात केंद्र सरकारकडून प्रत्येक लाभार्थ्याला घरकूल खरेदीसाठी अडीच लाखांचे अनुदान दिले जाणार आहे. तर उर्वरीत रक्कम लाभार्थ्याला भरावी लागणार आहे. 840 घरकुलांच्या या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध झालेला नसल्याने मनपा प्रशासनाकडून पाठपुरावा सुरु होता. त्यामुळे निविदा प्रक्रियाही रखडली होती.

केंद्र सरकारकडून राज्यातील सर्व प्रकल्पांसाठी राज्य सरकारकडे निधी वर्ग करण्यात आल्यामुळे सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी वर्ग करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. यात नगर महापालिकेला 5.04 कोटींचा पहिला हप्ता वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिकेला निधी वर्ग होताच दोन्ही प्रकल्पांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.

महापालिकेच्या 533 घरकुलांच्या प्रस्तावाची छाननी सुरू

महापालिकेने भागीदारी तत्वावर परवडणाऱ्या घरांसाठी तीन महिन्यांपूर्वी 533 घरकुलांचा नवीन प्रकल्प अहवाल शासनाकडे सादर केलेला आहे. या अहवालाची छाननी प्रक्रिया सुरू असून लवकरच हा प्रकल्पही मंजूर होण्याची शक्‍यता आहे. आगरकर मळा परिसरात या प्रकल्पासाठी जागा निश्‍चित करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)