नाला खोलीकरण, रूंदीकरणासाठी 67 लाख मंजूर -वैष्णवदेवी मोहिते पाटील

अकलूज- माळशिरस तालुक्‍यातील सहा गावांना कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या नाला खोलीकरण व रूंदीकरण करण्यासाठी 66 लाख 94 हजार 865 रूपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती माळशिरस तालुका पंचायत समिती सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील व उपसभापती किशोरसिंह सुळ यांनी दिली. यावेळी पंचायत समितीचे सदस्य युवक नेते अर्जुनसिंह मोहिते पाटील उपस्थितीत होते. वैष्णवीदेवी मोहिते पाटील व उपसभापती किशोर सुळ म्हणाले की, खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार हणुमंत डोळस यांच्या सहकाऱ्याने माळशिरस तालुक्‍यातील बचेरी येथील नाला खोलीकरण रंदीकरणासाठी 9 लाख 99 हजार 257, आनंदनगर 7 लाख 99 हजार 450, चाकोरे 8 लाख 99 हजार 353 , मांडकी 7 लाख 98 हजार , पिसेवाडी 7 लाख 98 हजार , बोंडले 13 लाख 98 हजार 224, तांदुळवाडी 10 लाख 2 हजार 578 अशी 66 लाख 94 हजार 865 रूपयांची प्रशासकीय मिळाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)