नार्कोस सिझन 4

जर तुम्ही हॉलिवूड टीव्ही सिरीजचे फॅन असाल तर तुम्हाला नक्कीच ‘नार्कोस’ मालिकांबाबत माहिती असेल. नार्कोस या मालिकेचे आतापर्यंत तीन सिझन प्रसिद्ध झाले असून याद्वारे पाब्लो एस्कोबार या कुप्रसिद्ध कोलंबियन ड्रग डिलरचे आयुष्य मांडण्यात आले. या वेळीची नार्कोस अर्थात ‘नार्कोस – मॅक्‍सिको’ ही फेलिक्‍स गॅलार्डो या मॅक्‍सिकन ड्रग डिलरचे आयुष्य उलगडून दाखवणार आहे. ‘नार्कोस-मॅक्‍सिको’च्या निमित्ताने फेलिक्‍स गॅलार्डो कोण होता याचा वेध घेण्याचा एक प्रयत्न…

फेलिक्‍स गॅलार्डो याला गुन्हेगारी जगतामध्ये एल पॅडिनो म्हणजेच ‘गॉडफादर’ या नावाने ओळखले जाते. फेलिक्‍स गॅलार्डो याने मेक्‍सिकोमध्ये 1980च्या दशकात आपले साथीदार राफेल कॅरो क्विन्टेरो आणि अर्नेस्टो फोन्सेका कॅरिलो यांच्या मदतीने गुआडालाजारा कार्टेल नावाने आपली गॅंग सुरु केली. गॅलार्डो याची गॅंग मुख्यतः अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये कार्यरत होती. हळू हळू त्याच्या गॅंगने संपूर्ण मॅक्‍सिको आणि अमेरिकन सीमारेषेवरील अमली पदार्थांचा व्यवसाय आपल्या ताब्यात घेतला. एका खुनाच्या खटल्यामध्ये गॅलार्डोचे दोन्ही साथीदार क्विन्टेरो आणि कॅरिलो यांना जेल झाल्यानंतर काही दिवस त्याने अंडरग्राउंड राहून ड्रग रॅकेट चालवले. त्यानंतर गेलार्डो किकी कॅमेरेना नामक एक अंडर कव्हर एजंटच्या संपर्कात आला. त्यानंतर कॅमेरेना आणि गॅलार्डो यांच्यामध्ये चांगली मैत्री जमली. कॅमेरेनाला गॅलार्डोच्या अवैध्य व्यापाराच्या सर्व खाणा-खुणा माहिती झाल्या मात्र तेव्हाच गॅलार्डोला कॅमेरेनाची खरी ओळख समजली. कॅमेरेनाची खरी ओळख समजल्यावर गॅलार्डोने त्याच्यासोबत काय केले? गॅलार्डोच्या ‘त्या’ अटक झालेल्या दोन साथीदारांचं पुढं काय झालं? पोलिसांनी गॅलार्डोला कशाप्रकारे बेड्या ठोकल्या? हा सर्व थरार ‘नार्कोस – मॅक्‍सिको’ मधून उलगडणार आहे.

– प्रशांत शिंदे 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)