नारी शक्‍ती!

       पत्रसंवाद

सुंभ जळला तरी पीळ कायम! येथे कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींना जितके मार्क द्यावेत तेवढे थोडेच. आमच्या महाराष्ट्राच्या साहेबांच्या प्रयत्नांना खरोखरच सुरूंग लावून विरोधी पक्षाचे नेतृत्व करण्यात सोनियाजींना यश मिळाले व त्या संयुक्‍त पुरोगामी आघाडी अर्थत यूपीएच्या अध्यक्षा झाल्या. भारतीय जनता पक्षासारख्या मातब्बर पक्षाकडून व त्यांच्या नेतृत्वाकडून कॉंग्रेसचे मुळापासून उच्चाटन केले गेले, कॉंग्रेसची दाणादाण झाली तरी “सुंभ जळला तरी पीळ कायम’ या म्हणीप्रमाणे कॉंगेसने सर्व विरोधी पक्षांचे नेतृत्व करावे यावर आज शिक्‍कामोर्तब होते.

मुंबईत सर्वपक्षीय “संविधान बचाव’ रॅलीचे नेतृत्व केल्यानंतर महाराष्ट्राचे साहेब दिल्लीतही हा प्रयोग करून आपल्याकडे नेतृत्व ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. पण अजूनही कॉंग्रेसची पुण्याई व तिचे मातब्बर सेनानी गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा यांनी हे विरोधी पक्षांचे नेतृत्व सोनियाजींकडे आणण्यात यशस्वी झाले, तेव्हा त्यांच्या मुत्सद्देगिरीला दाद द्यावीशी वाटते. वेळोवेळी आपल्याला नारी-शक्‍तीचा अनुभव येतो.

मग तो शैक्षणिक क्षेत्रात असो, वा खेल-कूद क्षेत्रात असो वा सामाजिक, राजकीय क्षेत्रात असो. सोनियाजींच्या घरी होणाऱ्या बैठकीला तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहून नारी-शक्‍तीची शान वाढवतील असे वाटते- नारी शक्तीला खूप खूप शुभेच्छा! आता भाजपाविरोधी पक्षांची आघाडी अनुभवी सोनियांच्या हातात आल्याने, विरोधकांचे मतैक्‍य होणे सुलभ होईल. महाराष्ट्रातील या पक्षाच्या नेत्याने राष्ट्रीय पातळीवर उडी मारणे गैरवाजवीच ठरले असते, असे म्हणावेसे वाटते. आता सोनियांच्या नेतृत्वात विरोधी आघाडी किती यशस्वी ठरते, ते पाहायचे.

– गोपाळ द. संत, पुणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)