नारी शक्ती पुरस्कार 3 ऑक्‍टोबर 2018 पर्यंत अर्ज करावेत

सातारा – दरवर्षी दि. 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून केंद्र शासनाने सन 2015 पासून ज्या महिला व संस्थांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी मौलिक कार्य केले आहे अशा महिला व संस्थांच्या सन्मानार्थ केंद्र शासनाकडून नारी शक्ती पुरस्कार देण्यात येणार आहे. संस्थेसाठी रु. 2 लाख व प्रशस्तीपत्र व वैयक्तिक पुरस्कारासाठी रु. 1 लाख व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना सदरचा पुरस्कार देण्यात येणार आहे.

नारी शक्ती पुरस्कार 2018 साठी पात्र इच्छुक व्यक्ती संस्थांचे विहित नमुन्यातील इंग्रजीमधील अर्ज मागाविण्यात येत असून सदरचे प्रस्ताव सादर करण्याकरिता व अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला एस. टी. स्टॅड शेजारी, सातारा यांचेकडे समक्ष संपर्क साधून परिपुर्ण प्रस्ताव 5 प्रतित दि. 3 ऑक्‍टोबर 2018 पर्यंत सादर करावेत असे आवाहन आर. एस. ढवळे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)