नारी शक्तीचा गौरव : ‘ही’ महिला झाली पहिली फायर फायटर

नवी दिल्ली : फायर फायटर  या महत्वाच्या पदावर पहिल्यांदाच एका महिलेची निवड झाली आहे. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने तानिया सन्याल यांना फायर फायटर पदावर नियुक्ती केली आहे.

याबद्दल एएआयचे अध्यक्ष गुरूप्रसाद महापात्रा म्हणाले,  फायर फायटर्स क्षेत्रात महिलांनाही प्रवेश देण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि तसा नियमही केला आहे. अहमदाबाद महापालिकेच्या अग्निशमन दलातील नियमातही असेच बदल केले होते, असेही ते यावेळी म्हणाले. एखादी महिला या क्षेत्रात रूजू होण्याची ही पहिलीच वेळ असून भविष्यातही यात सातत्य राहील, असे ते म्हणाले.

दरम्यान, या निवडीबद्दल तानिया सन्याल म्हणाल्या, पहिली महिला फायर फायटर झाल्याचा मला खूप आनंद झाला आहे. ही बाब देशातील सर्वच महिलांसाठी सन्मानाची आहे. मला नेहमी आव्हानात्मक काम करण्याची इच्छा होती. ती या निमित्ताने पूर्ण होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)